संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      संगमनेरात वॉर्ड रचनेच्या कामाला गती !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |      सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण     |      अनिल शिंदे यांना बंधू शोक     |      संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या! सात आरोपींना अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त     |     
संगमनेरात बनावट नोटांची छपाई By Admin 2025-02-20

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




पुणे गुप्तचर विभाग व संगमनेर पोलिसांची कारवाई एक जण ताब्यात

संगमनेर, दि. २० फेब्रुवारी -

संगमनेर शहरांनाजीक असलेल्या गुंजाळवाडी शिवारामध्ये बनावट नोटांची छपाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी थेट दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या आदेशाने पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर पोलिसांनी कारवाई केली असून काही साहित्यासह एकाला ताब्यात घेतले आहे.
संगमनेर मधील गुंजाळवाडी परिसरात एका घरात नोटा छापल्या जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. यासंदर्भात दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी पुणे गुप्तचर विभागाला माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पुण्याच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर मध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी छापा टाकला.या छाप्यात बनावट नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर कागद आणि चलनातील काही बनावट नोटा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.संगमनेरमध्ये आलेल्या गुप्तचर विभागाच्या चार अधिकाऱ्यांसह संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र बांडे, राहुल डोके, राहुल सारबंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.छापा मारण्यात आलेल्या ठिकाणी काही मुद्देमालासह रजनीकांत राहणे हा आढळून आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या नोटा छापून चलनात कशा वापरल्या गेल्या, त्यासाठीचा कागद कुठून आणला यासंदर्भात त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीस चौकशीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण वस्तुस्थिती समोर येणार आहे.

संगमनेरमध्ये आलेल्या गुप्तचर विभागाच्या चार अधिकाऱ्यांसह संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र बांडे, राहुल डोके, राहुल सारबंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.