दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
जवळे कडलग - वडगाव लांडगा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमधून संताप
संगमनेर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेले तालुक्यातील जवळे कडलग ते वडगाव लांडगा या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून रखडले आहे. रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने या रस्त्यावरून ये - जा करणे अवघड होत आहे.यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जवळे कडलग ते वडगाव लांडगा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे . या रस्त्याची दुरुस्ती करावी याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. ३ कोटी २५ लाख रुपये या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेले आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात आल्यानंतर या रस्त्याचे काम येवले कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले.