नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
नांदुरी दुमाला व मिर्झापूर येथे अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. By Admin 2025-04-10

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




नांदुरी दुमाला व मिर्झापूर येथे अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली.

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला व मिर्झापूर येथे अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची  *अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा प्र से)* यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. शेतीचे नुकसान झालेल्या टोमॅटो शेतकरी गणेश वलवे व ऊस उत्पादक शेतकरी भाजपचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष साहेबराव अशोकराव वलवे यांच्याशी चर्चा केली. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करा अशा सूचना मा. जिल्हाधिकारी यांनी केल्या. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी समन्वय साधून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या.  99% पंचनामे पूर्ण झाले असून त्या याद्या गावातील ग्रामपंचायत व व्हॉट्स ॲप ग्रुप वर प्रसिद्ध केलेल्या असून कोणाच्या काही अडचणी असल्यास संपर्क साधण्याची विनंती केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे चुकून राहिले आहेत त्यांनी ग्रामपंचायत मध्ये नावे दिली आहेत त्यांची उद्या तातडीने पंचनामे पूर्ण केली जातील अशी माहिती उपविभागीय अधिकारी  शैलेंद्र हिंगे यांनी दिली. प्रसंगी तहसिलदार धीरज मांजरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे,भाजपचे तालुका उपाध्यक्ष साहेबराव वलवे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊ राहणे, सर्कल ससे मॅडम, तलाठी योगिता वाळुंज, कृषी सहाय्यक मोरे मॅडम, शेलार, गणेश वलवे, भाऊसाहेब भालके, सदू शिरतार,अशोक वलवे, विश्वनाथ वलवे, विकास वलवे, प्रशांत फटांगरे, भाऊसाहेब घोडे,संतोष डोंगरे आदी शेतकरी उपस्थित होते.

* *पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोठी दिरंगाई होते व ती शासनाची मदत नुकसानीपेक्षा खूप तुटपुंजी असते त्यामूळे नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तरी भरीव व तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे शेतकऱ्यांच्या वतीने केली.*

        ....... साहेबराव वलवे

 (नुकसान ग्रस्थ शेतकरी तथा तालुका उपाध्यक्ष भाजपा संगमनेर )