नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
शहीद जवान मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेरात स्मारक व्हावे - काँग्रेसची मागणी By Admin 2025-07-17

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेला निवेदन

संगमनेर प्रतिनिधी

   संगमनेर तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर  यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्यांनी निधन झाले. मेजर संदीप घोडेकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विचार करून त्यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक व्हावे अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

      संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आली यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक ,राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, नितीन अभंग, जावेद खान पठाण, मुजिक खान, वसीम शेख ,आवेद खान, डॉ. विजय पवार , शेहेबाजअली शेख, अलोक बर्डे ,बादल जेधे, ललित शिंदे ,शरद पावबाके, एकनाथ श्रीपत, सुभाष दिघे, संजय कानवडे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर हे दिल्ली येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा व कर्तव्यपरायनता भविष्यात संगमनेर शहरातील नागरिकांना कायम देशसेवेसाठी प्रेरणा व स्फूर्तीदायी असणार आहे. त्यासाठी त्यांचे संगमनेर येथे स्मारक होणे गरजेचे आहे. तसेच संगमनेर येथील अकोला नाका चौकाला शहीद मेजर संदीप घोडेकर यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

चौकट

घोडेकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान कायम स्वरणात राहील 

                                     -  माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेरचे सुपुत्र मेजर संदीप घोडेकर हे देशसेवा बजावत असताना त्यांना मृत्यू आला. सैनिक हा घरदार सोडून देशाच्या सेवेकरता रात्रंदिवस सज्ज असतो. देश सेवा करताना वीरमरण आलेले हुतात्मा मेजर संदीप घोडेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांनी दिलेले देशाकरता बलिदान हे संगमनेर करांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे

हुतात्मा संदीप घोडेकर यांचे हुतात्मे देशासाठी - मा. आमदार डॉ. तांबे

संगमनेर शहरातील घोडेकर परिवारातील मेजर संदीप घोडेकर यांनी कायम देशसेवेला प्राधान्य दिले. देशी सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या या वीर जवानाने अखेरचा श्वासही सेवेत घेतला. इतक्या लवकर जाणे दुर्दैवी आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात  संगमनेर तालुका परिवार सहभागी असून त्यांचे हुतात्मे हे देशासाठी असून सदैव संगमनेर करांना संस्मरणीय राहील अशी भावना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे