राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर उभे केले By Admin 2025-11-26

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरचे बिघडलेले वातावरण दुरुस्त करण्यासाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे राहा माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर (प्रतिनिधी)--1991 पूर्वी गोंधळ असलेल्या नगर परिषदेला आदर्श शिस्त लावली. सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर उभे केले. शुद्ध पाणी शहरात मिळत आहे सुसंस्कृत व शांततेचे वातावरण आहे. वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत .रस्त्यांसह अनेक कामे मार्गी लागली आहेत. सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे .मात्र मागील एक वर्षांमध्ये काही अपप्रवृत्ती वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत असून संगमनेर शहराची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 

गणेश नगर व जयहिंद सर्कल येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेचे बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब ,वाकचौरे आमदार सत्यजित तांबे, उमेदवार दिलीपराव पुंड ,सौ सीमा खटाटे, भारत बोराडे सौ अर्चना दिघे, पांडुरंग घुले, श्याम शेठ पारख, अजित काकडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की 1991 पासून संगमनेर शहराला आदर्श शिस्त लागली. विकासाच्या अनेक योजना राबवल्या. तीस वर्षाच्या कार्यकाळात एकमताने सर्व ठराव पास झाले. एकदाही वाद झाला नाही. शहरासाठी आपण सातत्याने निधी आणून मोठमोठी विकास कामे मार्गी लावली. हायटेक बस स्थानक ,प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय ,पंचायत समिती, यांसह इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक आदर्श रस्ता बनवला. 35 गार्डन निर्माण झाली. 

Special Offer Ad